अल्पवयीन मुलींशी लैंगिक प्रतारणा, वडिलांसह काकाविरूद्ध पोलिसात गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: December 3, 2023 16:07 IST2023-12-03T16:06:29+5:302023-12-03T16:07:55+5:30

मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून छळ, वाच्यता केल्यास चटके देण्याची धमकी

Physical abuse with minor girls as police case registered against father and uncle | अल्पवयीन मुलींशी लैंगिक प्रतारणा, वडिलांसह काकाविरूद्ध पोलिसात गुन्हा

अल्पवयीन मुलींशी लैंगिक प्रतारणा, वडिलांसह काकाविरूद्ध पोलिसात गुन्हा

अमरावती: दोन अल्पवयीन मुलींची लैंगिक प्रतारणा केल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांसह मोठया काकाविरूद्ध शारीरिक अत्याचार, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी, पिडितांच्या आईच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी रात्री ९.२६ मिनिटांनी पिडिताचे ४६ वर्षीय वडिल व ५६ वर्षीय मोठ्या काकाविरूद्ध एफआयआर नोंदविला.

तक्रारीनुसार, या प्रकरणातील एक मुलगी ८ वर्षांची तर, दुसरी ११ वर्षांची आहे. तक्रारकर्ती महिला ही पती, दोन मुली व मुलासह गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर तिचा मोठा दीर देखील शेजारीच राहतो. जुलैमध्ये महिलेचे पती कन्हैय्या याच्याशी वाद झाला. त्यामुळे ती ज्या घरी स्वयंपाक बनवत होती, तेथेच राहायला गेली. तर तिने आपल्या तिनही मुलांना अन्य जिल्ह्यातील माहेरी पाठविले. मात्र काही दिवसांनी कन्हैय्या मुलींना घरी घेऊन आला.

काही दिवसांनी वडिलांनी आपल्याशी अश्लिल वर्तन केल्याचे आठ वर्षीय लहान मुलीने आईला अर्थात तक्रारकत्या महिलेला सांगितले. तो प्रकार एका शेजारी राहणाऱ्या महिलेने देखील तिला सांगितला. त्याचवेळी तुमचा मोठा दिर देखील तुमच्या लहान मुलीशी लैंगिक प्रताडना करत असल्याचे तिने महिलेला सांगितले. त्यामुळे महिलेने मुलींसह पती व त्याच्या मोठया भावावर लक्ष देणे सुरू केले. दरम्यन संपुर्ण प्रकार मुलींकडून समजताच महिलेने दोन्ही मुलींसह १ डिसेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.

Web Title: Physical abuse with minor girls as police case registered against father and uncle