शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मुख्याधिकाऱ्यांसमक्ष घेतले अंगावर पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:13 AM

रस्ता बांधकामात शहरात गजराज फिरला परतवाडा : अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ ते दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामात मुख्याधिकारी, ...

रस्ता बांधकामात शहरात गजराज फिरला

परतवाडा : अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ ते दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामात मुख्याधिकारी, नगरसेवक व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर बुधवारी एका व्यक्तीने अंगावर अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर पोलिसांच्या निर्देशानंतर तो इसम पोलीस ठाण्यात पोहचला.

विशेष रस्ते विकास निधीअंतर्गत दोन-चार दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले. यासाठी त्याने रस्त्या मोकळा करण्यासाठी साईडला असलेले अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण काढण्यात आले. दुरानी चौकातील एका पेट्रोलपंपजवळ गजराजसह अधिकारी पोहचले. तेथे पेट्रोलपंपशी संबंधित एका इसमाने गजराज न चालविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली. पेट्रोलपंपलगत रस्त्यावर डांबर नको. हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे तेथे पेव्हींग ब्लॉक बसवलेत. अशी आग्रही मागणी मुख्याधिकाऱ्यांपुढे ठेवली. यादरम्यान शाब्दिक चकमकही घडली. नगरपालिकेने टाकलेली चुण्याची लाईन बघून पेट्रोलची बाटली त्या इसमाने जवळ घेतली. त्यातील काही पेट्रोल अंगावरसुद्धा घेतले. या संपूर्ण घटनाक्रमाचे नगरपरिषदेकडून व्हिडीओ शुटींगही केले गेले.

बॉक्स

नगरपरिषदेला दंड

यापूर्वी मुख्याधिकारी गणेश देशमुख व एसडीओ अरुण डोंगरे हे असताना याच दुरानी चौकातील अतिक्रमण काढण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला होता. तेव्हा नगर परिषदेचे काही कर्मचारी गंभीर जखमीही झाले होते. संबंधितांनी हे प्रकरण न्यायालयात पोहचविले. यात न्यायालयाने लाखो रुपयांची पेनॉल्टी नगरपरिषदेवर ठोकली होती.

बॉक्स

रस्त्याचा मध्य काढा

रस्त्याचे काम करताना रस्त्याचा मध्य काढा. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुने सारखे अंतर घेऊन मग नगरपरिषदेने गजराज फिरवावा. अतिक्रमण काढताना कुठलाही भेदभाव करू नये. सरसकट एका लाईनमध्ये अतिक्रमण काढावे, अशी न्याय्य मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट

पेट्रोलपंपाशी संबंधित व्यक्तीने शाब्दिक वाद गालत अंगावर पेट्रोल घेण्याचाही प्रयत्न केला. संबंधितास असलेले आवश्यक दस्तऐवज सादर करण्यास सुचविले आहे. घटनेच्या अनुषंगाने लिखित तक्रार केलेली नाही. दस्तऐवज बघून पुढील कारवाई निश्चित करू.

- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, अचलपूर नगरपालिका