सभापती निवडीसाठी आज स्थायीची विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:35+5:30
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. भाजप नऊ, काँग्रेस तीन, एमआयएम दोन तसेच शिवसेना व बीएसपी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विद्यमान सत्ताकाळातील ही शेवटची टर्म असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीत नावांवर विचार करण्यासाठी बैठक झाली. यामध्ये महापौर, शहराध्यक्ष, सरचिटणीस, सभागृहनेता आदी उपस्थित होते.

सभापती निवडीसाठी आज स्थायीची विशेष सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. सभागृहात बहुमत असलेल्या भाजपमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच आहे. बुधवारी कोअर कमिटीच्या बैठकीतून चार नावे प्रदेश अध्यक्षाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. भाजप नऊ, काँग्रेस तीन, एमआयएम दोन तसेच शिवसेना व बीएसपी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विद्यमान सत्ताकाळातील ही शेवटची टर्म असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीत नावांवर विचार करण्यासाठी बैठक झाली. यामध्ये महापौर, शहराध्यक्ष, सरचिटणीस, सभागृहनेता आदी उपस्थित होते. एका नावावर एकमत न झाल्याने चार नावे प्रदेश अध्यक्षांकडे पाठविण्यात आली. यामध्ये राधा कुरील, विजय वानखडे, राजेश साहू व धीरज हिवसे यांचा समावेश असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली. शुक्रवारी सकाळी संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर नाव जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थायी समितीमध्ये भाजपचे राधा कुरील, विजय वानखडे, राजेश साहू, धीरज हिवसे, नीता राऊत, अनिता राज, पंचफुला चव्हाण तसेच सहयोगी सदस्य प्रकाश बनसोड व सुमती ढोके, काँंग्रेसचे प्रदीप हिवसे, सलीम बेग युसूफ बेग, सुनीता भेले, एमआयएमचे अब्दुल नाजिम, अ. रऊफ, शेख इमरान अ. सईद, बीएसपीच्या सुगराबी भोजा रायलीवाले व शिवसेनेचे भारत चौधरी यांचा समावेश आहे. यावेळी महिलांना संधी मिळणार का, याचे औत्सुक्य आहे.
चार उमेदवारी अर्जांची उचल
स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी एकूण चार अर्जाची उचल करण्यात आलेली आहे. यामध्ये भाजपचे सभागृहनेते सुनील काळे यांनी दोन, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी एक व एमआयएमचे शेख मोहम्मद इम्रान सईद यांनी एका उमेदवारी अर्जाची उचल केली. शुक्रवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत अर्ज दाखल होतील. ११ वाजता सभागृह सुरू होईल. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहणार आहे. मतदान हात उंचावून होईल, असे प्रशासनाने सांगितले.