शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:27 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने बेस्ट आॅफ फाइव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळविले.

ठळक मुद्देओजस कारंजकर द्वितीय : रसिका कानेटकर तृतीय, तर ऋतुजा इसळ ठरली चौथी, प्रणय शर्मा पाचव्यास्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने बेस्ट आॅफ फाइव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळविले. त्याने ४९५ गुण प्राप्त करून जिल्ह्यासह विदर्भातून टॉप केले आहे.अमरावती शहरात भंवरीलाल सामरा हायस्कूलचा ओजस कारंजरकर याने ९८ टक्के मिळवित ४९० गुण प्राप्त केले. तो जिल्ह्यातून दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. गोल्डन किड्सची रसिका कानेटकर ही ९९.६ टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी राहिली. तिने ४८८ गुण प्राप्त केले. मोर्शी येथील शिवाजी शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा इसळ हिने ४८७ गुण पटकावले. तिने ९७.४० टक्के गुण मिळवले असून, ती चौथ्या क्रमांकावर झळकली तसेच ज्ञानमाता हायस्कूलचा प्रणय शर्मा याने ४८४ गुण मिळवले. ९६.०८ टक्के प्राप्त करुन तो पाचव्या स्थानी आला आहे.जिल्ह्यात ६८५ शाळांच्या ४१ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार ५१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १३४१६ मुले आणि १५५७० मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी अनुक्रमे ६३.६७ व ८०.०९ अशी आहे. गतवर्षी जिल्हाचा दहावीचा निकाल ८६.४९ टक्के एवढा होता. यंदा तो ७१.५५ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १४.९४ टक्क््यांनी घसरला आहे. स्थानिक होलीक्रॉस हायस्कूलची विद्यार्थिनी संपदा चौधरी हिने ९७.८० टक्के, मोर्शी येथील शिवाजी हायस्कूलची ऋतुजा इसळ हिने ९८.८०, अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेची प्राची कहाने हिने ९७.२० टक्के गुण मिळवित यादीत स्थान पटकावले. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल