उष्माघाताचा तडाख्याने मोर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:14 IST2021-05-14T04:14:03+5:302021-05-14T04:14:03+5:30
पोहरा बंदी : चांदूर रेल्वे बीट पर्यटन स्थळ परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान चिरोडी वर्तुळातील वनरक्षक ...

उष्माघाताचा तडाख्याने मोर जखमी
पोहरा बंदी : चांदूर रेल्वे बीट पर्यटन स्थळ परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान चिरोडी वर्तुळातील वनरक्षक गोविंद पवार हे जंगल गस्त करीत असताना त्यांना शेड्यूल एक मध्ये मोडला जाणारा मोर जखमी अवस्थेत आढळून आला. त्या मोराची पाहणी केली असता तो शुध्दावस्थेत येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जखमी मोराला तातडीने चांदूर रेल्वे वर्तुळ कार्यालयात आणले.
चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक गोविंद पवार, वनमजूर शालिक पवार, शरद खेकाळे, विनायक लोणारे गावातील सूरज राठोड यांनी मोराला वाचविण्यासाठी धडपड केली. तात्काळ पशुवैद्यक अलोने यांना पाचारण करण्यात आले. त्या मोराची तपासणी केली असता, तो मोर एका पायाने लंगडा असल्याचे सांगितले. वर्तुळ कार्यालयात त्या मोरावर नियमित उपचार सुरू आहे. त्या मोराला उष्माघाताचा तडाखा बसल्याचे सांगण्यात आले.