एसटीला प्रवासी, कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:29+5:30

एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले.

Passengers to ST, staff waiting for pay | एसटीला प्रवासी, कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

एसटीला प्रवासी, कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक घडी रुळावर येईना : दोन महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना आपत्तीत राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या एसटी बसेस सुरू झाल्या असल्या तरी बºयाच फेऱ्या तोट्यात धावत आहेत. अशातच कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाहीत. त्यामुळे एसटीला प्रवाशांची, तर कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले. सध्या पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. सध्या एसटी बसेस २५ ते ३० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा एस.टी.बसेस धावत असल्या तरी प्रवासी नसल्याने फेऱ्या मर्यादेतच आहेत. वेतनाची घडी सध्या विस्कटली आहे. कोरोना आपत्तीत मार्च महिन्यात ७५ टक्के, एप्रिल महिन्यात शंभर टक्के, मे महिन्यात ५० टक्के, जून महिन्यात शंभर टक्के वेतन झाले. शासनाने केलेल्या मदतीमुळे मार्च व मे महिन्यातील उर्वरित वेतनही मिळाले. परंतु सध्या जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप वेतनाचा पत्ता नाही. एस.टी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नातून दिले जाते. परंतु सध्या उत्पन्न घटल्याने ही वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनस्तरावरू न मदतीचा हात मिळणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील चित्र
जिल्ह्यात फेब्रुवारीत एसटी महामंडळाला सरकारी ४० लाख रुपये उत्पन्न १ लाख ४० हजार किलो मीटर अंतर कापल्यानंतर मिळत होते. ते सध्या सप्टेंबरपर्यंत ५० हजार किलोमीटर ८ आगारांतील १५० गाड्यांनी ५० हजार अंतर कापल्यानंतर १०.३० लाख मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या उत्पन्न बरेच घटल्याचे चित्र आहे.

कोरोना आपत्तीत कर्तव्य बजावणाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये भत्ता मिळालेला नाही. कोरोना बळींच्या वारसांना मदत मिळाली नाही. वेतनही नाही.
- मोहित देशमुख, विभागीय सचिव

Web Title: Passengers to ST, staff waiting for pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.