पालकांनो सावधान ! युवतींना प्रेमजाळ्यात फसविणारी टोळी सक्रिय
By Admin | Updated: March 4, 2015 00:35 IST2015-03-04T00:35:14+5:302015-03-04T00:35:14+5:30
प्रेम करणे गुन्हा नाही, परंतु प्रेम म्हणजे नेमके काय? प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे.

पालकांनो सावधान ! युवतींना प्रेमजाळ्यात फसविणारी टोळी सक्रिय
संजय खासबागे ल्ल वरुड
प्रेम करणे गुन्हा नाही, परंतु प्रेम म्हणजे नेमके काय? प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे. आजच्या युगात लज्जा वेशीवर टांगून सार्वजनिक ठिकाणी टवाळखोर युवक-युवतींना प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याकडे पालकांचे पाल्यावर नसल्यामुळे मुलामुलींच्या वागणुकीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर सामाजिक समस्येचा वेध घेण्यासाठी शहरातील मंदिरे, तीर्थक्षेत्र, उद्यानांना भेटी दिल्या असता काहीसा विचित्र दिसून आला.
असंख्य युवक-युवती नको त्या अवस्थेत दिसत होती. त्यांना कुणाचेही भय नसल्याचे दिसून आले. तारूण्यात पदार्पन करणारी ही शाळकरी मुले गणवेशातच शाळेतून बाहेर पडली होती. त्यांनी थेट नागठाणा, शेकदरी, सालबर्डी , अप्परवर्धा प्रकल्पासारखे निर्जन स्थळ शोधले होते. एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेऊन एकमेकांशी अश्लील चाळे सुरु केले होते. अंगात शाळेचा गणवेश, दफ्तर त्यांच्या पाठीवर असते.
आईबाबांना शाळेत जाण्याचे कारण सांगूून स्वैराचाराने वागणारी ही युवा पीढी आज भरकटल्याचे दिसून आले. याचा शोध कुण्याही पालकाने घेतला नाही. अगदी कमी वयातील किशोरवयीन मिशीची साधी कोर नसलेली ही मुले. प्रेमाच्या नावाखाली स्वैैैराचाराचा आनंद लुटत होते.लोकं काय म्हणतील याची तमा नव्हती.
मुलांच्या भरकटलेल्या पाऊलवाटा आयुष्याचे वाटोळे करु शकतात
ग्रामीण मुलींना प्रलोभन
देऊन फसविणारी टोळी
शहरात शिक्षणासाठी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थिनी येतात. परंतु भामटे, टवाळखोर मुले त्या मुलींना हेरतात. त्यांना मोबाईलसह आकर्षित करणाऱ्या वस्तूचे प्रलोभन देऊन भावनाप्रधान होऊन ‘मी तुझाच आहे , तुझ्याशिवाय माझे कुणीच नाही ’ ‘साथ जियेंगे , साथ मरेंगे ’ वाटेल त्या प्रेमळ शब्दाचा वापर करुन अलगदच तरुणींना आपल्या प्रेमजाळयात अडकवितात. दिवसागणिक वाढणारे दिखावू प्रेमापुढे भरपूर काही करुन जाते. यातच मोबाईलवर अश्लील फोटो, चित्रफीत काढून पुढे तिचे लैंगिक शोषण केले जाते.
पोलीस प्रशासनही हतबल !
टवाळखोर युवकांना धडा शिकविण्यासाठी पोलीस सक्रिय असतात. परंतु कारवाईच्या वेळी पालक समोर येत नाही. बदनामीच्या भीतीपोटी म्हणून तक्रार दिल्या जात नाही. यामुळे पालकांच्या अनावस्थेमुळे पोलीससुध्दा कारवाई करुन शकत नसल्याने हतबल झाले. यामुळे पालकांनी जागृत होऊन पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.