पांदण रस्त्यावरील पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:48+5:30
रस्त्याच्या मध्ये हा नाला वाहत असल्याने तो ओलांडून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी दिल्यानंतर येथे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु सदर कंत्राटदारांनी तात्पुरत्या स्वरूपात या पुलावर कच्चा रस्ता बनविला. पावसामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने आता शेतकऱ्यांना शेती साहित्य डोक्यावर घेऊन त्या नाल्यातून पाय तुडवीत शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पांदण रस्त्यावरील पूल गेला वाहून
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी ते जळका हिरापूर मार्गावरील पुलासह संपूर्ण रस्ताच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बी-बियाणे नेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाल्यावरील पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु लॉकडाऊन दरम्यान कामे ठप्प असल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही.
देवरी निपाणी ते जळका हिरापूर मार्गावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेती आहे. परंतु रस्त्याच्या मध्ये हा नाला वाहत असल्याने तो ओलांडून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी दिल्यानंतर येथे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु सदर कंत्राटदारांनी तात्पुरत्या स्वरूपात या पुलावर कच्चा रस्ता बनविला. पावसामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने आता शेतकऱ्यांना शेती साहित्य डोक्यावर घेऊन त्या नाल्यातून पाय तुडवीत शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सदर बांधकाम मंजूर करण्याबाबत कोणत्या प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत.
शेतकरी चिंताग्रस्त
देवरी निपाणी ते जळका हिरापूर येथील पांदण रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे या शेतकºयांना शेती पडीक राहील की काय, असे वाटू लागले आहे. सद्यस्थितीत रस्त्याने बैलजोडी किंवा ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले आहे. सोयाबीन आणि रासायनिक खते शेतात पेरणीकरिता कसे न्यावेत, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या पांदण रस्त्यावरुन दोन ते तीन गावांतील नागरिकांची ये-जा असते. मात्र पूल वाहून गेल्याने शेती कामासाठी लागणारी अवजारे कशी न्यायची, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. महसूल यंत्रणेने त्याची दखल घेऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी केली आहे.