Panchayat Samiti Elections: Tivasa, Dhamnagaon Congress, BJP on Chandur Railway | पंचायत समिती निवडणूक : तिवसा, धामणगाव काँग्रेसकडे, चांदूर रेल्वेत भाजप 
पंचायत समिती निवडणूक : तिवसा, धामणगाव काँग्रेसकडे, चांदूर रेल्वेत भाजप 

अमरावती : जिल्ह्यात जाहीर झालेल्या पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात तिवसा, धामणगाव रेल्वे या दोन पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश मिळविले. चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सहापैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत. तीनही पंचायत समित्यांच्या २० गणांसाठी रविवारी मतदान पार पडले. सोमवारी मतमोजणी घेण्यात आली.

विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस व भाजपच्या आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला लागले होते. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात तिवसा पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सर्व सहाही उमेदवार निवडून आलेत. चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सहापैकी चार जागा भाजपने जिंकल्या. दोन जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या. धामणगाव रेल्वे येथील आठ सदस्यीय पंचायत समितीत काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. तेथे भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे हे दोन्ही तालुके धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात मोडतात. त्यात भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या गृहतालुक्यात काँग्रेसने वर्चस्व राखले. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसने धामणगाव पंचायत समितीची सत्ता खेचून आणली.
 

Web Title: Panchayat Samiti Elections: Tivasa, Dhamnagaon Congress, BJP on Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.