ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये करण्यात आले आहे. ...
अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगावच्या जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळेतील दोन शिक्षक कायमच मोबाईलवर व्यस्त राहत असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. ...
इंटरनेट व स्मार्ट फोनच्या युगाचा फायदा गुन्हेगारी विश्वातील लोक घेत असून आपणाला बेमालूम फसविले जाते. यामध्ये विदेशी महिलांचा वापर अधिक असल्याचा घडलेल्या घटनांवरून दिसून येते. ...