‘पालकमंत्री हा खोटा माणूस!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:29 PM2017-12-15T23:29:03+5:302017-12-15T23:32:33+5:30

रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे.

'Guardian Minister is a false man!' | ‘पालकमंत्री हा खोटा माणूस!’

‘पालकमंत्री हा खोटा माणूस!’

Next
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांनी डागली तोफ : बेलोरा विमानतळाचा रेंगाळलेला मुद्दा तापला

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे. विमानतळ विकासाचे वचन खोटारडेपणाचे आहे. समृद्धी महामार्गासाठी ४३ हजार कोटी रुपये आहेत आणि विमानतळासाठी तीन वर्षांपासून ७५ कोटी उपलब्ध होऊ नये, हे न समजण्याजोगी जनता खुळी नाही, असा थेट वार जगताप यांनी ना. प्रवीण पोटे यांच्यावर केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते.
बेलोरा विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी स्वत: चालविणार आणि विकासासाठी दोन टप्प्यांत ७५ कोटी देणार, असा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतला. शासन या निर्णयाचे श्रेय घेवू इच्छित असल्याच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी तोफ डागली. गत वर्षभरापासून जळू ते बेलोरा वळण रस्ता (बायपास) करिता १५ कोटी निधी देऊ शकले नाही, ते ७५ कोटी काय देणार? सरकारचा हा निर्णय म्हणजे खोटारडेपणा होय. राज्यात भाजपचे सरकार असेपर्यंत बेलोरा विमानतळाचा विकास शक्य नाही. पुढील वर्षी बेलोरा विमानतळाहून छोटी विमाने सुरू करणे ही पालकमंत्र्यांची थाप होय, असा थेट आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या काळातच विमानतळ विकासाला जमीन मिळवून दिली आणि काँग्रेसचे सरकारच येत्या काळात विमाने सुरू करेल, असा टोला आ. जगताप यांनी लगावला. विमानतळ विकासासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतलेल्या बैठकी जगतापांनी निरर्थक ठरविल्यात. माझ्या मते, पालकमंत्री प्रभावशून्य आहे. वर्षभरात ते बेलोरा विमानतळाचा वळण रस्ता निर्माण करू शकले नाही; आता विमानांचे उड्डाण होईल, हे कुणालाही पटणारे नाही, असा आसूड त्यांनी ओढला. विमानतळ विस्तारीकरणात बडनेरा ते यवतमाळ मार्ग बंद होणार होते. मी स्वत: पुढाकार घेऊन पाच गावांच्या शेतकºयांची जमीन मिळवून दिली. मात्र, बायपासचे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे बेलोरा विमानतळाहून येत्या सहा ते आठ महिन्यांत मोठी विमाने ‘टेक आॅफ’ घेतील, हा पालकमंत्र्याचा दावा तद्दन खोटा आहे. आताही विमानतळावर छोटी विमाने दिवसाच उतरतात. विमानतळाची धावपट्टी १३७२ मीटरवरून १८५० मीटर लांब होणे भाजप सरकारच्या काळात शक्यच नाही. ते काँग्रेस सरकारच करू शकेल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थापा मारणे बंद कराव्यात. शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असा सल्ला आ. जगतापांनी दिला.
जिल्हयाची खऱ्या अर्थाने विकासाकडे झेप - पालकमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. केंद्रीय मार्ग निधी व बांधकाम विभागाकडून सुरू झालेल्या रस्ते निर्मितीमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. बेलोरा विमानतळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला होता. मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्यांनी निर्णय घेऊन बेलोरा विमानतळ विकासाचा शब्द पाळला. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमुळे बेलोरा विमानतळावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असेल व अमरावती हवाईमार्गाने जोडले जाणार असल्याने औद्योगिक वसाहतीत अधिकाधिक उद्योग येऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. इतर शहरांप्रमाणेच आता बेलोरा विमानतळावरून लवकरच विमानांची ये-जा सुरू होऊन अमरावतीच्या विकासात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

विमानतळाला मिळाले ७५ कोटी
डिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’: मुख्यमंत्र्यांची अमरावतीकरांना नववर्षाची भेट

गुरुवार, १४ डिसेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेलोरा विमानतळाचा विकास महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून करण्यास मान्यता प्रदान आली तसेच ७५ कोटी रुपये हे दोन टप्प्यांत दिले जाणार असून, १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकरांना खऱ्या अर्थाने ही नववर्षाची भेट दिली, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितल
बेलोरा विमानतळावरून डिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’ होईल. यासंदर्भात २१ नोव्हेंबर रोजी ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतरच खºया अर्थाने विमानतळाच्या विकासाला गती मिळाली आहे. प्रारंभी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून बेलोरा विमानतळ विकसित केले जाणार होते. काही तांत्रिक कारणांमुळे आता महाराष्ट्र शासनाने बेलोरा विमानतळ स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची विशेष प्रकल्प वाहक (ये-जा) म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीला प्रस्ताव देण्यात आला आहे.
बेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळ विकासासाठी ७५ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. यात विमानतळ हाताळण्याच्या क्षमतेची टर्मिनल इमारत उभारणे, फायर स्टेशन व एटीसी टॉवर, अप्रन (एपीआरओएन) क्षमतेत वाढ करणे, तीन एटीआर व एक एअर बस बोइंग, बडनेरा-यवतमाळ बाह्य वळण रस्ता, रस्त्यालगतच्या विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ यांना जोडणाºया चौपदरी रस्त्याचे काम, विमानतळास पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांनी विमानतळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.

 

Web Title: 'Guardian Minister is a false man!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.