वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत इंदला, उत्तर वडाळी या जंगलात सोमवारी अचानक लागलेल्या आगीत १३ हेक्टर वनक्षेत्र जळाले. यात १० हेक्टर खासगी क्षेत्रालाही क्षती पोहोचली आहे. जोरदार वारे वाहत असल्याने आग नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांना सुमारे तीन तास कसरत करावी ल ...
बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी ख ...
रेल्वेस्थानक परिसर व खुल्या जागांवर वाढते अतिक्रमणावर सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे. दरम्यान रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा बल कुचकामी ठरल्याचा अभिप्राय वरिष्ठांनी नोंदविला आहे. अमरावती व बडनेरा येथील रेल्वे मालमत्तांचे येत्या ...
शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने जिल्हाकचेरी व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत विभाग ...
अमरावती - स्थानिक व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात. दुसरी आगीची घटना चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ... ...
जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रति ...
सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुनील गजभियेच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री खामगावातून अटक केली. रहमान इब्राहिमखान पठाण (४१,रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याच्या चौकशीनंतरही शीतलच्या हत्येचे ...
शहरातील विहिरीतून गाळ काढण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री घेण्यासाठी सात दिवसांत निविदा प्रक्रिया करण्यात येईल, असे निर्देश देताना अतिरिक्त आयुक्तांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेत उघड झाला. ...
शहरातील मध्यवस्तीतील चार व्यापारी प्रतिष्ठानांना चोरट्यांनी लक्ष्य करून १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी कोतवाली हद्दीत तीन व राजापेठ हद्दीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडल्याच्या घटनांनी खळबळ उडाली होती. ...
पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळा सध्या सकाळच्या ६.५० ते ११.५० या वेळेत सुरू झाल्या असून, त्या वेळेत मुख्यालयापासून ६ कि.मी. अंतरावरील जिल्हा परिषद शाळा उतावली व कढाव या शाळा बंद दिसून आल्या. त्यामुळे शिक्षकांवर वरिष्ठ अधिकाºयांचा वचक नस ...