हळद शेतीने दिला शेतकऱ्यांना हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:40 AM2018-04-23T01:40:43+5:302018-04-23T01:40:43+5:30

पारंपरिक पिकांना फाटा देत यावर्षी तिवसा तालुक्यातील भारवाडी गावातील राऊत बंधूंनी हळद पिकाची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नांत त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन तालुक्यातील इतर शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

Farmers give turmeric by farming | हळद शेतीने दिला शेतकऱ्यांना हात

हळद शेतीने दिला शेतकऱ्यांना हात

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील पहिलाच प्रयोग : अडीच एकरात २५० क्विंटल उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : पारंपरिक पिकांना फाटा देत यावर्षी तिवसा तालुक्यातील भारवाडी गावातील राऊत बंधूंनी हळद पिकाची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नांत त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
तालुक्यातील भारवाडी या गावच्या मिलिंद आणि सचिन या राऊत बंधूंनी पारंपरिक पिकांना फाटा देत मागील वर्षी जून महिन्यात अडीच एकरात हळद पिकाची लागवड केली. या शेतीमधून त्यांना २५० क्विंटल उत्पादन झाले आहे. सेलम जातीच्या हळदीची ४ बाय ४ अंतरावर बेड पद्धतीने लागवड करण्यात आली. याआधी राऊत सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची लागवड करीत असत. मात्र, यावर्षी हळदीची लागवड करताना त्यांनी आंतरपीक म्हणून तूर पेरली.
राऊत बंधूंना एक लाख रुपये लागवड खर्च आला असून, तो वजा जाता निव्वळ नफा चार लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
हळदीचे मार्केटिंग आपण स्वत:च करणार असल्याची माहिती मिलिंद राऊत यांनी दिली, तर आंतरपीक म्हणून घेतलेले तुरीचे उत्पन्न हे बोनस मिळणार आहे

काही तरी नवीन प्रयोग करण्याची इच्छा मनात होती. यातून तिवसा तालुक्यातील पहिला हळद उत्पादक झालो आहे. शेतकऱ्यांनी काढलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे.
- सचिन राऊत, हळद उत्पादक, भारवाडी

Web Title: Farmers give turmeric by farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.