एकाच रुग्णालयात पंधरवड्यात ६३ डेंग्यू रुग्ण आढळणे ही साथ नसून महामारीची लक्षणे आहेत. त्या महामारीला महापालिका जबाबदार असल्याचे बजावत आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचा पदभार काढण्याचे निर्देश आ. रवि राणा यांनी महापालिका आयुक्तांना दिले. ...
बीटवरील पर्यवेक्षिका आमच्याकडून अवैध वसुली करतात. त्यांना नकार दिल्यास मानसिक त्रास देतात, अशा आशयाचे लेखी निवेदन आ. वीरेंद्र जगताप यांना देताना अंगणवाडी सेविकांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग एटीएम कार्डसारखे काम करीत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून आपली समृद्धी साधावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे शनिवारी केले. ...
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा व परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शेकडो जनांनी शनिवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासननिषेधाच्या घोषणा देत मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिक ...
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रात्रकालीन गस्तीत सर्चिंग आॅपरेशन सुरू केले. शहरात नुकत्याच घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी सर्व ठाण्यांना सक्त निर्देश दिले आहेत. गुन ...
दोन महिन्यांपासून घोंगावत असलेले महापौरपदाचे वादळ अखेर शमले. प्रदेशाध्यक्षांना निवेदन देऊनही पदरी काहीही न पडल्याने ‘बंडोबा’ थंडगार झाले आहेत. पेल्यातले हे वादळ शमल्याने महापौर संजय नरवणे चांगलेच कॉन्फिडंट झाले आहेत. त्यांच्यातील या बदलाची प्रचिती गु ...
शहरात जागोजागी पाणी व कचऱ्याचे ढीग साचल्याने घाणीचे साम्राज्य पाहता, आरोग्य विभागातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी घेऊन शुक्रवारी युवक काँग्रेसने महापालिका आयुक्तांना घेराव घातला. आयुक्तांना मच्छरदानी भेट देऊन कार्यकर्त्यांनी शहराती ...
'टायगर मॉस्किटो' नावाने ओळखल्या जाणाºया ‘इडिस इजिप्त’ डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूने शहरात पाय पसरविले असून, अकोली रोड स्थित पार्वतीनगरात तर या आजाराने कहरच केला आहे. बऱ्याच घरातील नागरिक डेंग्यूने बाधित झाल्याने येथे भीतीचे वातावरण आहे. ...
धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास सातुर्णा बसस्टॉपजवळ घडली. विजय लक्ष्मण गुर्जर (२२,रा. मायानगर) असे मृताचे नाव आहे. ...