फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:38 PM2018-08-13T22:38:08+5:302018-08-13T22:38:26+5:30

खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे.

Soya bean flower | फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादनात घट होण्याची भीती : बाष्परोधकाची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.
वास्तविक सोयाबीन हे मध्यप्रदेश येथील पीक. परंतु, या दशकात वऱ्हाडात खरिपाच्या कॅश क्रापची जागा घेतल्याने कपाशी माघारली. सोयाबीनला बाजारात वाढती मागणी आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा यावर निश्चित फरक पडतो. गतवर्षी बोंडअळीने दोन लाख हेक्टरमधील कपाशी उद्धवस्त झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली. यंदाच्या खरिपात साधारणत: दोन लाख ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्यात यंदा ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाल्याने एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के सोयाबीन आहे. आतापर्यत सोयाबीनची वाढही चांगली झाली. १०० ते ११० दिवसांचे हे पीक ४५ दिवसांननंतर आता फुलोऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपासून पावसात खंड आहे. त्यातही ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे फुलोराचे रुपांतर शेंगामध्ये होण्याऐवजी फुलगळ होण्याचा धोका अधिक आहे. शेंगा पकडल्याच तर त्यामधील दाणा बारीक राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारात पिकाचे उत्पन्नात २५ ते ४० टक्के घट येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पावसाने पळविले आहे.
फुलोºयावर अन् शेंगा भरताना पाऊस आवश्यक
सोयाबीनचे पीक पावसाला अतिसंवेदनशील आहे. पीक फुलोºयावर असताना पावसाची आवश्यकता असते. अन्यथा फुलोर गळून पडतो. तसेच सोबीनच्या शेंगा पक्वहोण्याच्या कालावधीत पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून दानादेखील बारीक पडतो. यामुळे पिकाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तूट येते. संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पाण्याची पाळी देणे गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.
अन्यथा नुकसान होण्याची शक्यता
जिल्ह्यातील सोयाबीन सध्या फुलोऱ्यावर आहे. मात्र, पावसाचा खंड असल्याने पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) याची १०० लिटर पाण्यात १ किलो अशी फवारणी आवश्यक आहे. हे बाष्परोधक व न्युट्रीएंटचे काम करीत असल्याने किमान १५ दिवस तरी पावसाचा ताण पीक सहन करू शकते, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषीशास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले.

Web Title: Soya bean flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.