जिल्हा बंदच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी सकल मराठा समाजाने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढली. मां जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने शहर दुमदुमले. कुठेही अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेऊन शहरातील बांधवांनी गुरुवारी सकाळी राजकमल चौकात ठिय्या देण्यासाठी ...
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त प्रल्हाद हरिश्चंद्र कावरे (७०,रा. पोटे टाउनशिप) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गाडगेनगर हद्दीतील हॉटेल गौरी इन समोरच्या रस्त्यालगतच्या झाडावर घडली. ...
संप कालावधीत एका शासकीय संस्थेचा कर्मचारी कार्यालयीन काम करीत असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे केस कापल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाºयाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचा ...
शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असतानाच चैतन्य कॉलनीतही डेंग्यूने उच्छाद मांडल्याची स्थिती आहे. महापालिकेला प्राप्त रक्तजल नमुन्यांच्या अहवालात चैतन्य कॉलनीतील पाच रहिवासी डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा डेंग्यू संदर्भातील उ ...
जिल्ह्यात जीवघेणा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असतानाही अद्याप जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब किट उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला जनतेची काळजी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी ३७ साप आढळून आल्याने खळबळ उडाली. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांचा सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ...
आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे. ...
रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावंडगाव येथे १९ वर्षीय युवकाने पाच वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली. ...
कॅम्प स्थित भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या टॉवरवर तरुण चढल्याने मंगळवारी प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. टॉवरवर चढलेल्या नीलेश भेंडेचे हे अभिनव आंदोलन मीडियावर व्हायरल झाले अन् प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. ...
सकल मराठा समाजाच्या युवकांनी मंगळवारी सायंकाळपासून शिवगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. गुरुवार सकाळपर्यंत याच ठिकाणी ठिय्या राहणार आहे. त्यानंतर हे सर्व युवक जिल्हा बंदच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ...