राफेल घोटाळा, काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:42 PM2018-09-24T22:42:02+5:302018-09-24T22:42:18+5:30

राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे. या देशविघातक मुद्यावर जाब विचारण्यासाठी काँग्रेसने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी वाढती महागाई, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी रेटण्यात आली.

Raffel scam, Congress's Elgar | राफेल घोटाळा, काँग्रेसचा एल्गार

राफेल घोटाळा, काँग्रेसचा एल्गार

Next
ठळक मुद्देसामान्यांच्या मुद्यांवर उठविला आवाज : जिल्हा कचेरीवर धडकला महामोर्चा, प्रचंड घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे. या देशविघातक मुद्यावर जाब विचारण्यासाठी काँग्रेसने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी वाढती महागाई, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी रेटण्यात आली.
जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा धडक मोर्चाद्वारे भाजप सरकारचा कडाडून निषेध करण्यात आला. मोर्चास प्रारंभ करण्यापूर्वी स्थानिक ईर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हारार्पण व अभिवादन करण्यात आले. काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर, माजी आमदार केवराम काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छाया दंडाळे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकताच काँग्रेस नेते भाजप सरकारविरोधी आक्रमक झाले. राफेल विमान खरेदीत घोटाळा झाला असून, गोपनीयतेच्या नावाने भाजप सरकारने खासगी कंपनीमार्फत करार केला आहे.

या आहेत काँग्रेसच्या मागण्या
राफेल खरेदीत तब्बल ४५ हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे या घोटाळयाची सर्वंकष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. नऊ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाºया विजय मल्ल्याला विदेशात पळून जाण्यास मदत करणारे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे व उर्वरित शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी. बोंडअळी नुकसानभरपाई, तूर, हरभºयाच्या भावाच्या फरकाची रक्कम दसºयापूर्वी मिळावी. दुष्काळ परिस्थितीत ओलितासाठी शेतकºयांना १२ तास सलग वीजपुरवठा करा. मूग, सोयाबीनला हमीभाव देऊन त्वरित खरेदी सुरू करावी. सरकारने नाफे ड व व्ही.सी.एम.मार्फत केलेल्या तूर व हरभºयांची रक्कम द्यावी. वीज दर कमी करावे. बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. पेट्रोल, डिझेल व स्वयपांक गॅसची भाववाढ कमी करावी. पीकविमाधारकांना त्वरित लाभ द्यावा. काँग्रेस सरकारने अल्पसंख्यकांना दिलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे आणि आदिवासींचे खावटी कर्ज माफ करून नवीन कर्जपुरवठा करावा यासह अन्य मागण्यांकडे काँग्रेसने शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, यशवंतराव शेरेकर, जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, गिरीश कराळे, प्रकाश साबळे, अरुण वानखडे, प्रमोद दाळू, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, नितीन दगडकर, सुरेश निमकर, अर्चना मेश्राम, श्रीराम नेहर, मनोज देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अभिजित देवके, आदी सहभागी झाले होते.

सिलिंडरची तिरडी
जिल्हा काँग्रेसच्या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सिलिंडरची तिरडी यात्रा काढली. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकºयांना पीक नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, इंधन दरवाढ कमी झाले पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, खावटी कर्जमाफी व नवीन कर्ज मिळालेच पाहीजे आदी मागण्यांच्या फलकांनी लक्ष वेधले होते.

पोलीस-कार्यकर्ते
आमने-सामने
भाजप सरकारच्या विरोधात काढलेला काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी बॅरिकेड्स आडवे लावून रोखला. येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख यांनी उपस्थित पोलिस अधिकाºयांना मोर्चा पुढे जाऊ द्यावा, अशी सूचना केली.

कार्यकर्ते चढले जिल्हा कचेरीवर
काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेसचे नेते मोदी सरकारविरोधात घोषणा देत होते. दरम्यान, युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा कचेरीवर चढले. काँग्रेसचे झेंडे हातात घेवून भाजप सरकार विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी करून जनतेची व शेतकºयांची फसवणूक केली. राफेल घोटळ्याने या सरकारचा खरा चेहरा सामोर आला आहे. शेतकरी व जनेतच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून अन्याय करणारे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यामुळे या सरकारला धस्रÞडा शिकविण्याची गरज आहे.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा

‘अच्छे दिन’ हे आमिष ठरले. शेतकरी व जनतेला ‘बुरे दिन’ आले आहेत. शेतकºयांच्या मालाला दाम देण्याऐवजी त्यांचीच लूट सुरू आहे. शेतकरी व जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नाही. कर्जमाफी, शेतमाल खरेदी, नुकसान भरपाई असे अनेक प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले.
- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वे

भाजप सरकारची कर्जमाफी फसवी आहे. शेतकºयांना या सरकारने न्याय न देता अन्यायाची मालिका चालविली. सोयाबीनचे अनोनात नुकसान आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. महागाई वाढली आहे. असे अनेक प्रश्न सोडविण्यात आले नाहीत. ४५ हजार कोटींचा राफेल घोटाळा या सरकारने केला. त्याबाबत चौकशी व्हावी आणि शेतकरी व जनेतला न्याय या सरकारने द्यावा
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Raffel scam, Congress's Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.