मेळघाटात अशिक्षितपणामुळे अनिष्ट रूढी कायम आहेत. त्यामुळेच आधुनिक सुधारणा स्वीकारण्याकडे त्यांचा कल नसतो. अशावेळी उभ्या ठाकलेल्या संकटातून निभावल्यास कौतुक होते. असेच कौतुक चाकर्दा येथील महिलेच्या वाट्याला आले आहे. ...
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. तथापि, संत्रा ऐन आंबिया बहराला आला असताना, पाणी टंचाईने तोंड वर काढले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ...
गतवर्षीचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला. १३ तालुक्यांत ५० पैशांचे आत पैसेवारी असल्याने दुष्काळस्थिती जाहीर झालेली आहे. अशा स्थितीत ७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा पीक विमा हप्ता भरणा केला. ...
अकोला राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे ...
पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
कमी पावसाचे पीक म्हणून डाळिंबाची गणना होत असली तरी सध्याचा भडकलेला पारा झाडांची रया घालवत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकरी या झाडांचे गाठोडे बांधत आहेत. ...
पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत. ...