मागील तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटांना समोरा जात आहे. यंदाही अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांन प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने करीत ...
प्रभागनिहाय सफाई कंत्राटात शहर स्वच्छतेचे काम जोमाने होईल, असा होरा साफ खोटा ठरला आहे. पाऊस मेहरबान असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. ...
महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल अपिलीय प्रकरणात विभागीय सहनिबंधकांद्वारे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली. याप्रकरणी सहकारी संस्थांचे अपर निबंधक डॉ. नागनाथ यगलेवाड यांनी २० जुलैच्या पत्रान् ...
पावसाळ्यात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांद्वारे नागरी वस्तीमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येने होत आहे. वॉर या वन्यजीवप्रेमी संस्थेने रविवारी एकाच दिवशी तीन ठिकाणाहून कोब्रा या विषारी जातीचे सात साप पकडले. त्यांना जंगलास सोडून जीवदान देण्यात आले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साहित्य, वस्तू पुरवठादार येथील गाला एन्टरप्रायजेसला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी घेतला. यापुढे ‘गाला’कडून कोणत्याही प्रकारचा पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. ...
संपुर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असताना वरुड मोर्शीकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. दोन्ही तालुक्यातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिली पेरणी मोडण्याच्या स्थितीत असल्याने दुबार पेरणीसाठी दमदार पाऊस हवा आह ...
मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या हातून राख्या तयार करण्यात येत आहेत. यंदा जिल्हा सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवरील जवानांना १० हजार राख्या पाठविल्या जातील, अशी माहिती नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली. ...
स्वप्न मोठी बघा. ती साकारण्यासाठी श्रम, जिद्द बाळगून ते प्रयत्न करा. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मधून देशातून मुलींमधून प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी शनिवारी तरूणाईला दिला. ...