जिल्हा परिषद सत्ताधारी पक्षाने सन २०१८-१९ मध्ये बांधकाम विभागाकडील ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. सदर नियोजनात प्रस्तावित केलेल्या कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्यात न आल्याने या ...
नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जून रोजी पकडल्या गेलेल्या ट्रकमधून ५५ लाखांच्या गांजाचे मोठे घबाड उघडकीस आले. ही माहिती बडनेरातूनच फुटल्याची आणि येथेच अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहिती सूत्रांकडून ‘ल ...
शहरात भारनियमन वाढले. आयपीडीएस योजनेची अपूर्ण कामे आहेत. डीबी उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाध ...
विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे. ...
तब्बल दोन महिन्यांच्या धमाल सुटीनंतर बुधवारी शाळेची घंटा वाजली. सत्रारंभाला मोठ्या दिमाखात विद्यार्थ्यांनी शाळेत एन्ट्री मारली. कुठे ढोल-ताशांच्या गजर, कुठे प्रभातफेरी, तर कुठे गुलाबपुष्पांची उधळण; सोबतीला नवीकोरी पाठ्यपुस्तके आणि गणवेशही... उत्साहाच ...
नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वरील लोणी टाकळीजवळ स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून बुधवारी सकाळी तब्बल ५५ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, अंमली पदार्थ विरोधीदिनीच ही कारवाई करण्यात आली. केळीने भरलेल्या ट्रकमधून गांजाची तस्करी के ...
आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहे ...
तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत. ...