पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:19 AM2019-08-18T01:19:28+5:302019-08-18T01:19:59+5:30

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.

Watery Melghat: Overcoming six villages in scarcity | पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । सत्यमेव जयते स्पर्धा; प्रथम दहा लाख, द्वितीय सहा लाख, तृतीय बक्षीस चार लाखांचे

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.
मेळघाटातील धारणी, चिखलदरा हे दोन्ही तालुके यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले होते. चिखलदरा तालुक्यातील १२६ व धारणी तालुक्यातील १०६ अशा २३२ गावांनी यासंबंधी प्रशिक्षण घेतले. पैकी सहा गावांना पुरस्कार मिळाले. धारणी तालुक्यातील बोथरा, बेरदाबल्डा द्वितीय, तर दहेंडा गाव तिसºया क्रमांकावर राहिले. चिखलदरा तालुक्यातील आवागडला प्रथम, बामादेहीला द्वितीय व कुलंगणा (बु) गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. बीडीओ देशमुख, तहसीलदार खाडे, तांत्रिक अधिकारी अमोल बोंडे, अनिल भिलवे, आरएफओ हिरालाल चौधरी, वनरक्षक अरुण डाखोरे, कृषी अधिकारी अरुण बेठेकर, चिखलदरा तहसीलदार मनीष गायकवाड, कृषी अधिकारी पठाळे, डीएफओ पीयूषा जगताप, वनपाल अभय चंदेले, तांत्रिक अधिकारी प्रमोद नागले, नारायण आठवले आदींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
मेळघाटात टँकरमुक्तीचा संदेश
वॉटर कप स्पर्धेमुळे मेळघाटातील आदिवासी पाण्यासाठी जागरूक झाले आहेत. जलसंधारण, जलसंवर्धन करण्यासाठी २५० पेक्षा अधिक गावांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग आदिवासींमध्ये जागृती आणणारा ठरला आहे मेळघाटातील सहा गावांनी जलसंधारणात उत्कृष्ट काम करुन टँकरमुक्तीचा संदेश दिला आहे.

Web Title: Watery Melghat: Overcoming six villages in scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.