विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले. ...
आज मला आनंद होतोय की, अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून या जनादेश यात्रेला सुरुवात होतीय, मी राजनाथ सिंह यांच्या स्वागत करतो, ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बुधवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा कचेरीवर धडक देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथेही साडेचारशे रुग्णालयांचा ओपीडी कक्ष बुधवारी सकाळी ६ पासून २४ तासांसाठी बंद ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे. ...
महापालिका हद्दीत मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक अशा ८७ इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक ३३ मालमत्तांच्या मालक-भोगवटदारांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या. ...
वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गुंतवणूक धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव अवलंबविला आहे. त्यानुसार बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या ठेवीपैकी ८० कोटींची ठेव जास्त व्याजदर देणाºया बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव गुंतवणूक समितीने तयार केला आहे. ...