जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी ...
पांडव अज्ञातवासात चिखलदरा येथे आले होते. परतीच्या वेळी याच ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे. अशा या ऐतिहासिक सहाशे वर्ष पूर्वी खोदकामात सापडलेलि गणेश मुर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे . ...
श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे. ...
सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या ...
नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्य ...
जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत ६५३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही १०२ टक्केवारी आहे. याच दिनांकापर्यंत मागील वर्षी ४३७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ...
सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन ...
यंदा शेतकऱ्यांची स्थिती बिकट असल्याने ४२ लाख शेतकऱ्यांकडे २७ हजार कोटींची वीज थकबाकी असतानाही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेकशन कापलेले नाही, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...