पान ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:58+5:302020-12-11T04:37:58+5:30

---------- अचलपूर येथे दिव्यांग दिन अचलपूर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

Page 3 | पान ३

पान ३

----------

अचलपूर येथे दिव्यांग दिन

अचलपूर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सावरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मनवरकर, विस्तार अधिकारी, खोजरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मालगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. संचालन सचिन टोपे यांनी केले. प्रास्ताविक मोनिका लांडे यांनी केले. दलाल, मोरे, वरखडे, वानखडे, जहाँआरा, वायवर यांनी परिश्रम घेतले.

-----------------

ग्रामीण भागातील नागरिकांना ‘लाल परी’ची प्रतीक्षा

पुसला : कोरोनाकाळात लॉकडाउन लागल्यापासून एसटी बस बंद होत्या. त्यामुळे खाजगी प्रवाली वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. अनलॉक झाल्यानंतरही वरूड तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बस सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्याना बसला आहे.

-------------

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

शेंदूरजनाघाट : स्थानिक पेट्रोल पंपानजीक एमएच २७ बीवाय ९०८६ क्रमांकाच्या दुचाकीला एचएच ४० बीसी ४८९० क्रमांकाच्या पीकअप वाहनाने धडक दिली. यात मोहम्मद तारीफ मोहम्मद फारूख (२०, रा. जुनी मशीद, नागपूर) हा मृत्युमुखी पडला. शेंदूरजनाघाट पोलिसांनी याप्रकरणी अबरार हुसैन यांच्या तक्रारीवरून भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

वाद सोडविणाऱ्याला मारहाण

जरूड : जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्यावरून घातलेला वाद सोडविला म्हणून गजानन साहेबराव धुर्वे (२२, रा. वरूड) याला अन्नू ऊर्फ मोहसीन खान (२६), पक्या ऊर्फ प्रकाश युवनाते (२६) यांनी लाकडी बल्लीने डोक्यावर मारहाण केली. संत्रा मंडी गेटसमोर ७ डिसेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

मुलाच्या वादातून युवतीला मारहाण

मोर्शी : तालुक्यातील येरला

येथील २० वर्षीय युवतीला मुलाशी वाद घातल्याच्या कारणावरून मंजूषा कृष्णराव महाजन (३६, रा. अंजनगाव बारी) या महिलेने मारहाण केली. तिचा धाकटा भाऊ विनय यालाही मारहाण करण्यात आली. मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला. ---------

Web Title: Page 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.