शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे वाजू लागले पडघम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:12+5:302020-12-27T04:10:12+5:30
अमरावती : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच या निवडणुकीनंतरच शिक्षकांच्या हक्काची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि ...

शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे वाजू लागले पडघम
अमरावती : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच या निवडणुकीनंतरच शिक्षकांच्या हक्काची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरू झाली आहे. त्यामुळे बँकेचे निवडणुकीतील पॅनेल्स आतापासूनच कामाला लागले आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केले आहेत. शिक्षक बँकेची मुदत २३ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आलेली आहे. राज्य शासनाच्या आदेशामुळे शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. मात्र आता ही मुदत वाढ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे लगेच नवीन वर्षात बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची दाट शक्यता आहे. ही बाब हेरून शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत. अनेकांनी तर संभाव्य उमेदवारांची चाचपणीसुद्धा सुरू केलेली आहे. शिक्षक सहकारी बँकेत सध्या शिक्षक समितीच्या मार्गदर्शनात प्रगती पॅनेलची सत्ता असून या पॅनेलचा प्रमुख घटक असलेल्या शिक्षक समितीचे गोकुलदास राऊत यांनी पाच वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. अन्नघटक संघटनाच्या काही संचालकांना प्रत्येकी एक वर्षासाठी उपाध्यक्षपद देण्यात आले. शिक्षण बँकेत सत्ताधारी प्रगती पॅनेलचे १५ संचालक असून त्यात समितीची ११ शिक्षक परिषद २, शिक्षक महामंडळ १,उर्दू शिक्षक संघटना १, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना १ याशिवाय एकता पॅनेलचे ५ संचालक आहेत. यात अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ २ पदवीधर व प्राथमिक तथा केंद्रप्रमुख सभा १, कास्ट्राइब शिक्षक संघटना १ व युवाशक्ती १ असे संचालक आहेत.
बॉक्स
शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहताच जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनसुध्दा कामाला लागली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सर्वाधिक सदस्य आहेत. १४ तालुक्यांत कर्मचारी युनियनचे जाळे पसरले आहे. त्यामुळे कर्मचारी युनियनचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.