मध्यवर्ती कारागृहात धान शेतीची खाचरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:01:11+5:30
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळीपालन, मस्त्यपालन, पशुपालनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत.

मध्यवर्ती कारागृहात धान शेतीची खाचरं
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी धान शेतीची कास धरली आहे. पाच वर्षांपासून धान शेतीचा प्रयोग यशस्वी होत असून, यंदा मंगळवारी तीन एकर परिसरात धानाची रोवणी करण्यात आली. कारागृहाने श्रीराम प्रजातीची निवड केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळीपालन, मस्त्यपालन, पशुपालनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत. कारागृहाची ७० ते ७५ एकर शेती असून, हंगामानुसार पिके घेण्यात येतात. वर्षभराच्या भाजीपाला, कांदे, गव्हाचे उत्पादन घेतले जाते. धान शेतीसाठी १० कैदी नेमण्यात आले आहेत.
धान शेतीसाठी गुडघाभर पाण्यात श्रम
कारागृहात धान शेतीसाठी कैद्यांनी गुडघाभर पाणी साचून राहील, अशी खाचरं तयार केली आहेत. या खाचरांमध्ये धानाची रोवणी करण्यात आली. त्यासंबंधी कौशल्य असलेल्या बंदीजनांकडे ही जबाबदारी सोपविली आहे.
धान शेतीचा प्रयोग पाच वर्षांपासून सुरू आहे. यावर्षीसुद्धा श्रीराम प्रजातीच्या धानाची रोवणी करण्यात आली. खुल्या कारागृहातील कैद्यांना धान शेतीतून रोजगार उपलब्ध होतो.
- रमेश कांबळे,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.