नैसर्गिक आपत्तीपुढे पॅकेज, कर्जमाफी निष्फळ
By Admin | Updated: July 28, 2014 23:17 IST2014-07-28T23:17:07+5:302014-07-28T23:17:07+5:30
सन २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. फेब्रुवारी-मार्चमधील गारपीटग्रस्त असो वा अलीकडच्या २१ व २२ जुलैची अतिवृष्टी. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था

नैसर्गिक आपत्तीपुढे पॅकेज, कर्जमाफी निष्फळ
चांदूरबाजार : सन २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. फेब्रुवारी-मार्चमधील गारपीटग्रस्त असो वा अलीकडच्या २१ व २२ जुलैची अतिवृष्टी. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सन २००६ मध्ये अमरावती विभागातील पाच व वर्धेसह सहा जिल्ह्यांत सर्वाधिक १४४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेनंतर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सन २०१० मध्ये ११७७, २०१२ मध्ये ९५० तर मागील वर्षी ८०२ शेतकऱ्यांनी विविध समस्यांमुळे जीवनयात्रा संपविली आहे.
प्रत्येक योजनेला कात्री लावल्याप्रमाणे शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांनादेखील निकष लावून शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. पात्र व अपात्र आत्महत्या किती यापेक्षा नोंदविण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्येचा आकाडा येथील स्थिती स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. परिश्रम घेत, शेतीत घाम गाळणाऱ्या अन्नदात्यावर ही वेळ का येते, याची कारणे अद्यापही शोधण्यात आली नाहीत. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यास शासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)