बिबट्याच्या शोधासाठी रात्रभर पाळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:26+5:302021-07-07T04:15:26+5:30
ग्रामस्थांची टीम कार्यरत धामणगाव रेल्वे : दोन दिवसांपूर्वी एका ट्रॅक्टर चालकाला बिबट दिसला, असे म्हटले असले तरी या ...

बिबट्याच्या शोधासाठी रात्रभर पाळत
ग्रामस्थांची टीम कार्यरत
धामणगाव रेल्वे : दोन दिवसांपूर्वी एका ट्रॅक्टर चालकाला बिबट दिसला, असे म्हटले असले तरी या भागात त्याच्या कोणत्याही पाऊलखुणा आढळल्या नाही. दरम्यान, वन विभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
विरूळ रोंघे परिसरात दोन दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर चालक मुरूम भरण्यासाठी गेला असता, त्याला बिबट्या दिसला असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दोन पथके या जंगल परिसरात रवाना केली. रात्री कोणीही परिसरात एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, रविवारी रात्री सचिन नवले, वनपाल किशोर धोत्रे यांच्या उपस्थित एक पथक रात्रीला ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगलात पाठविण्यात आले. बिबट्याच्या कोणताही पाऊलखुणा आढळल्या नसल्या तरी ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण होऊ नये, यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहे. दररोज रात्रीला दोन पथके जंगल परिसरात या ट्रॅप कॅमेऱ्यांवर निगराणी ठेवणार आहेत.