शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नवाथे भुयारी पूल निर्मितीचे श्रेय आमचेच

By admin | Updated: October 11, 2015 01:34 IST

नवाथेनगरातील भुयारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राजकारण होत आहे.

अमरावती : नवाथेनगरातील भुयारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राजकारण होत आहे. काही जण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या पुलाच्या निर्मितीचे खरे श्रेय आमचेच असल्याचे नगरसेवक दिगंबर डहाके यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.भुयारी पुलाच्या कामासाठी या प्रभागाच्या नगरसेविका सुनीता तायडे व आपण प्रत्येकी ३० लाख असा आमच्या वाट्याला आलेला एकूण ६० लाखांचा निधी उपलब्ध केला व तत्कालीन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी महापालिकेच्या फंडातून ४० लाख अशा एक कोटींची तरतूद केली. अशाप्रकारे एक कोटीच्या निधीतून या भुयारी पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे.या पुलाचा कार्यारंभ ७ एप्रिल रोजी झाला व १८० दिवसांची मुदत असताना मुदतीच्या आत काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण २३ किंवा २४ आॅक्टोबरदरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे, ना. रणजित पाटील, महापौर, विरोधी पक्षनेते, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत होणार आहे. आमचा प्रभाग, आमचाच निधी, म्हणून लोकार्पणाचा कार्यक्रमदेखील आम्हीच ठरवू. यामध्ये श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे डहाके यांनी यावेळी सांगितले. या भुयारी पुलाची रिटेनिंग वॉल १८० मीटर लांब आहे. १७० मीटर काँक्रीट रस्ता, दोन काँक्रीट नाल्या, लायटिंगची व्यवस्था, हिरवळ आदी कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भुयारी पुलांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोण करीत आहेत याविषयीचे भाष्य त्यांनी टाळले. पत्रपरिषदेला नगरसेविका सुनीता तायडे आदी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)