पुसल्यात ओटे रिकामे, रस्त्यावर बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:42+5:302020-12-17T04:39:42+5:30
नियोजित जागा सोडून मुख्य मार्गावर अतिक्रमण, नियोजनाचा अभावपुसला - येथील आठवडी बाजारातील भाजी विक्रेते दुकाने बाजार ओट्याच्या नियोजित ...

पुसल्यात ओटे रिकामे, रस्त्यावर बाजार
नियोजित जागा सोडून मुख्य मार्गावर अतिक्रमण, नियोजनाचा अभावपुसला - येथील आठवडी बाजारातील भाजी विक्रेते दुकाने बाजार ओट्याच्या नियोजित जागेऐवजी मुख्य रस्त्यावर थाटत आहेत. यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे आठवडी बाजातील ओटे मात्र रिकामेच आहेत.
पुसल्याशी आजूबाजूची आदिवासी खेडी संलग्न आहेत. दर मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. बाजार करण्यास मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. अलीकडेच आठवडी बाजाराचे नियोजन कोलमडले असून, आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व व्यावसायिकांकरिता बांधून देण्यात आलेल्या बाजार ओटे व नियोजित जागेवर न भरता मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यात येतात. आठवडी बाजारात दुकाने लावण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने गर्दीतून नागरिकांना, वाहनधारकांना चालताना एकमेकांना धक्का लागल्यास भांडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व व्यावसायिकांना ग्रामपंचायत प्रशासनाने समज देऊन नियोजित जागेवरच दुकाने थाटावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.