आदेश सुटले

By Admin | Updated: July 26, 2016 00:21 IST2016-07-26T00:21:12+5:302016-07-26T00:21:12+5:30

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी भातकुलीचे ठाणेदार एस.डी.राऊत यांना फोन करून खडेबोल सुनावले.

Order disappeared | आदेश सुटले

आदेश सुटले

पोलीस आयुक्त : दारुविक्रेत्यांना हजर करा
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी भातकुलीचे ठाणेदार एस.डी.राऊत यांना फोन करून खडेबोल सुनावले. गणोरी आणि परिसरात दारूचा एक थेंबही आढळल्यास निलंबित करेन, असा इशाराच त्यांनी ठाणेदाराला दिला.
गणोरीत अवैध दारूविक्री करणाऱ्या चौघांनाही दोन तासांत उचलून आणा. मंगळवारी सकाळी माझ्यासमोर त्यांची पेशी करा, असे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांना आयुक्तांनी दिलेत.
गणोरीच्या महिलांनी तक्रारीत ज्या दारूविक्रेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे, त्यांचा पाच वर्षांचा रेकॉर्ड सादर करा. जो कुणी अवैध दारूविक्री करीत असेल त्याच्याविरुद्ध १०७, १५१ कलमांनुसार तत्काळ प्रतिबंधक कारवाई करा, असे आदेशही आयुक्तांनी भातकुलीच्या ठाणेदारांना दिलेत.
आयुक्तांनी अवैध दारूविक्रत्यांविरुद्ध आदेशांचे जे बाण सोडलेत, त्यामुळे गणोरीतील तमाम महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)

यशोमती ठाकुरांचाही पोलीस आयुक्तांना फोन
दारुबंदीविरुद्ध एकत्रित झालेल्या सर्व महिला असल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनीही याप्रकरणी मदत करावी, यासाठी काही महिलांनी पुढाकार घेतला. यशोमती ठाकूर मुंबईकडे रवाना झाल्या असताना त्यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. दोषी पोलिसांना निलंबितच करतो, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी त्यांना दिली.

Web Title: Order disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.