व्यापारी फिरकेना संत्रा उत्पादक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:01:24+5:30
पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पूर्णा प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींमधील पाण्याच्या पातळीत दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादन घेण्यासाठी केला. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रारोपे लावण्यात आली. हमखास पाण्यामुळे ब्राह्मणवाडा थडी, माधान, घाटलाडकी, वणी, सोनोरी, नानोरी, ब्राह्मणवाडा पाठक, विश्रोळी, काजळी, देऊरवाडा, सुरळी, जसापूर, दिलालपूर या गावातील संत्रा उत्पादक शेतकरी सधन व समृद्ध झाला आहे.

व्यापारी फिरकेना संत्रा उत्पादक अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणवाडा थडी : यंदा आंबिया बहराची संत्राफळे उपलब्ध असताना, व्यापारी फिरकत नसल्याने ब्राम्हणवाडा पंचक्रोशीतील संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत.
पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पूर्णा प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींमधील पाण्याच्या पातळीत दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादन घेण्यासाठी केला. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रारोपे लावण्यात आली. हमखास पाण्यामुळे ब्राह्मणवाडा थडी, माधान, घाटलाडकी, वणी, सोनोरी, नानोरी, ब्राह्मणवाडा पाठक, विश्रोळी, काजळी, देऊरवाडा, सुरळी, जसापूर, दिलालपूर या गावातील संत्रा उत्पादक शेतकरी सधन व समृद्ध झाला आहे.
संत्र्याचा आंबिया बहर हा पाणी असेल, तरच घेता येतो. या संत्र्याला भावही बऱ्यापैकी असतो. परिसरातील संत्रा उत्पादकांचे आंबिया बहर हे मुख्य पीक आहे. यामुळे परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता आली आहे. परिसरात आंबिया बहराची संत्री उपलब्ध आहेत. परंतु, यावर्षी कोरोनामुळे संत्रा विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. मेहनत करून संत्री पिकविली; मात्र तो खपत नसल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी आॅगस्ट ते डिसेंबर अखेरपर्य$ंत बागेतील फळांची तोडणी चालते. यावर्षी जुलै महिना संपला तरी व्यापारी शेतात दाखल झाले नाहीत.
करार-मदार केव्हा?
दरवर्षी साधारणत: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच संत्राबागांच्या विक्रीबाबत शेतकरी व व्यापाºयांचे करार सुरू होतात. यावर्षी जुलै महिना संपत आला असला तरी अजून एकही करार झाला नाही. कोरोनाकाळात मालवाहतूक करताना अडचणी येत असल्याने व्यापाऱ्यांनी अजूनपर्यंत खरेदी सुरू केले नसल्याचे स्थानिक संत्रा विक्री दलाल संपतराव आमझरे यांनी सांगितले.