शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महापालिकेतील #MeeToo दडपविण्याचा खटाटोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:43 PM

महापालिकेतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने डॉक्टरविरुद्ध दिलेली मानसिक छळवणुकीची तक्रार दडपविण्याचा वृथा खटाटोप काहींनी चालविला आहे. चौकशीची ब्याद नको म्हणून तडजोडीसाठी विशाखा समितीमधील काहींनीच तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविल्याची खात्रीलायक माहिती आहे.

ठळक मुद्देविशाखावर दबाव : तक्रारकर्त्या महिलेकडे प्रमुखपदाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने डॉक्टरविरुद्ध दिलेली मानसिक छळवणुकीची तक्रार दडपविण्याचा वृथा खटाटोप काहींनी चालविला आहे. चौकशीची ब्याद नको म्हणून तडजोडीसाठी विशाखा समितीमधील काहींनीच तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविल्याची खात्रीलायक माहिती आहे. महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्याकडेही या महिलेने याबाबतची तक्रार केली आहे. सध्या देशभरात ‘मी टू’चे वादळ उठले असताना, डॉक्टरवर झालेल्या या आरोपांमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.महापालिकेतील तत्कालीन कंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्याविरोधातील एका महिला कर्मचाऱ्याची तक्रार निर्णयाविना फाईलबंद करण्यात आली होती. त्याचअनुषंगाने ही तक्रार सामंजस्याने सोडविण्याबाबत विशाखाचे काही सदस्य आग्रही असल्याची माहिती समितीतील सदस्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. सदार यांच्याविरोधातील तक्रारीची नव्याने चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी दिले होते. मात्र, सदार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही ती चौकशी अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलेली नाही. त्यापार्श्वभूमिवर ही तक्रार मागे घ्यावी, आरोपी डॉक्टरने महापालिकेबाहेर त्यातून सन्मान्य तोडगा काढावा, असा सल्ला दिल्याची माहिती हाती आली आहे.२८ सप्टेंबरला महापालिकेतील एका डॉक्टरने आपल्याशी वाद घातला. त्या वादाचे व्हिडिओ रेकॉडिंग केले. तत्पूर्वी २७ सप्टेंबर रोजी याच डॉक्टरने नगरसेविकेसह आपलाही अपमान केला. २० वर्षांपेक्षा कनिष्ठ डॉक्टरने केलेली ती कृती प्रचंड अपमानजनक असून त्या डॉक्टरला कठोर शासन करावे, अशी तक्रार एका वरिष्ट अधिकारी महिलेने आयुक्तांकडे केली. त्यानंतर ४ आॅक्टोबरला ती तक्रार विशाखा समितीकडे प्राप्त झाली. ४ आॅक्टोबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तब्बल १३ दिवसाने अर्थात १७ आॅक्टोबर रोजी विशाखा समितीची बैठक झाली. त्यात मानसिक छळवणुकीचा आरोप असलेल्या डॉक्टरला सुनावणीसाठी बोलावण्यात आले.बैठकीतील माहितीनुसार, त्या डॉक्टरला समज देऊन आणि माफी मागून प्रकरण संपविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे आता तक्रारकर्ती महिला अधिकारी नेमका काय पवित्रा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तक्रार मागे घेण्यासाठी ‘चार्ज’महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरविरुद्ध तक्रार करणाºया त्या महिला अधिकाऱ्याकडून एका महत्त्वाच्या पदाचा प्रभार काढून अन्य व्यक्तीकडे देण्यात आला होता. रजेहून परतल्यानंतर तो प्रभार त्यांना देण्यात आला नाही. मात्र, त्या व्यक्तीविरोधात विशाखाकडे तक्रार दिल्याबरोबर थेट आयुक्तांनीच त्या महिला आधिकाऱ्याला प्रभार बहाल केला. त्यातून तक्रारीचे गांभीर्य कमी करण्यात प्रशासन आणि विशाखा समितीला यश आल्याचा सूर महापालिकेत उमटला आहे.