हातपाय बांधून बालिकेवर अत्याचार

By Admin | Updated: February 19, 2017 00:04 IST2017-02-19T00:04:20+5:302017-02-19T00:04:20+5:30

हातपायासह डोळे व तोंडाला पट्टी बांधून एका बालिकेवर लंैगिक अत्याचार केला.

Oppression of the girl by kneeling | हातपाय बांधून बालिकेवर अत्याचार

हातपाय बांधून बालिकेवर अत्याचार

रेवसा येथील घटना : नराधम इसम पसार
अमरावती : हातपायासह डोळे व तोंडाला पट्टी बांधून एका बालिकेवर लंैगिक अत्याचार केला. ही घटना वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रेवसा येथे शुक्रवारी सायंकाळी उघड झाली. हबीब शाह कादर शाह (४२,रा.रेवसा) असे आरोपीचे नाव असून तो नराधम पसार झाला आहे.
रेवसा येथील एक ११ वर्षीय बालिकेच्या घराशेजारीच आरोपीचे राहतो. १४ फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पीडित बालिका घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी तिच्या घरात दाखल झाला. त्याने मुलीला पाणी पिण्यास मागितले. दरम्यान त्याने तिला जवळ घेऊन अश्लील चाळे सुरू केले. याबाबत तिने विरोध केला असता आरोपीने तिचे हातपाय दोरीच्या साह्यायाने बांधले. तिने आरडाओरड करू नये, म्हणून आरोपीने बालिकेच्या तोंडावर व डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपीने कोणालाही न सांगण्यासाठी बालिकेला धमकी दिली. मात्र, तिला होणाऱ्या वेदना तिने कुटुंबीयांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेची तक्रार शुक्रवारी वलगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी हबीब शाह कादर शाहविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(अ), ४,८,१२ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Oppression of the girl by kneeling