‘पद्मावत’ चित्रपटाला अमरावतीत विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:26 IST2018-01-24T00:25:42+5:302018-01-24T00:26:16+5:30

पदमावत चित्रपटाला देशभरात विरोध झाल्यानंतर आता अमरावतीतही विरोध होऊ लागला आहे.

Opposition to 'Padmavat' in Amravati | ‘पद्मावत’ चित्रपटाला अमरावतीत विरोध

‘पद्मावत’ चित्रपटाला अमरावतीत विरोध

ठळक मुद्देचित्रपटगृहांना संरक्षण : आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : पदमावत चित्रपटाला देशभरात विरोध झाल्यानंतर आता अमरावतीतही विरोध होऊ लागला आहे. मंगळवारी काही नागरिकांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याबाबत सहकार्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती.
सर्वोच्च न्यायालय व सेन्सॉर बोर्डाने पद्मावत चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात मनोरंजनाच्या नावावर काल्पनिकतेचा सहारा घेत पद्मावत चित्रपट प्रकाशित केला जात असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. चित्रपटात दाखविलेल्या महाराणी पद्मावती या आमच्या मातेसमान आहेत. प्रेरणास्त्रोत आहे. या महान मातेची उज्ज्वल छबी इतिहासाशी छेडछाड करून काही विदेशी व पैशांसाठी लालची लोक कलंकित करीत आहे. जोहर व सती हा एकच विषय समाजवून जोहरचा इतिहास कलंकित करून असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शहरातील काही नागरिकांनी केला आहे.

Web Title: Opposition to 'Padmavat' in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.