११ अभियंत्यांच्या नियुक्तीला विरोध

By Admin | Updated: June 21, 2015 00:24 IST2015-06-21T00:24:53+5:302015-06-21T00:24:53+5:30

महापालिकेत अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे चालावे, ..

Opponents of the appointment of 11 engineers | ११ अभियंत्यांच्या नियुक्तीला विरोध

११ अभियंत्यांच्या नियुक्तीला विरोध

आयुक्तांवर ताशेरे : महापालिकेत स्थायी समितीने विषय फेटाळला
अमरावती : महापालिकेत अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे चालावे, यासाठी आयुक्तांनी मानधन तत्त्वावर ११ अभियंत्यांची नेमणूक केली आहे. मात्र या अभियंत्यांच्या नियुक्तीलाच शनिवारी स्थायी समितीत विरोध करण्यात आला असून याविषयी येत्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांना घेरण्याची रणनीती सुरु झाली आहे.
सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती विलास इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी दिगंबर डहाके, राजेंद्र तायडे, सारिका महल्ले, अजय गोंडाणे, तुषार भारतीय, सुनीता भेले, नीलिमा काळे, कांचन उपाध्याय, भारत चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Opponents of the appointment of 11 engineers