शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

आॅपरेशन मुस्कान : १३ बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:41 AM

आॅपरेशन मुस्कान अंतर्गत मुलामुलींच्या शोधमोहिमेत शहर पोलिसांनी १३ बालकांचा, तर ग्रामीण हद्दीत दोन बालकांचा शोध घेतला आहे. त्यापैकी काही बालकांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, तर काही बालकांना बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले.

ठळक मुद्देशहर-ग्रामीण पोलिसांची कामगिरी : ३१ डिसेंबरपर्यंत शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅपरेशन मुस्कान अंतर्गत मुलामुलींच्या शोधमोहिमेत शहर पोलिसांनी १३ बालकांचा, तर ग्रामीण हद्दीत दोन बालकांचा शोध घेतला आहे. त्यापैकी काही बालकांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, तर काही बालकांना बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले.जिल्ह्यातील ५४ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता आहेत. पोलिसांनी आॅपरेशन मुस्कान मोहीम राबवून त्यांचा शोध घेतला. शहर व ग्रामीण अशा एकूण ४१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेपत्ता, हरविलेल्या व अपहृत मुला-मुलींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. प्रत्येक ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अल्पवयीन मुलामुलींची शोधमोहीम सुरू आहे. शहर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी भटकणाºया १३ मुलांची चौकशी केली. त्यात दोन मुली आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आल्या. त्या दोघींना समुपदेशनानंतर आर्वी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याशिवाय ११ बालकामगार आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीकडे सोपविले आहे.ग्रामीण हद्दीतील पोलिसांनीही दोन बालकांचा शोध घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यांच्याविषयी माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पोलीस विभागाकडून १ ते ३१ डिसेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०१७ व २०१८ दरम्यान दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांपैकी १८ मुली व पाच मुले अद्याप गवसली नाहीत. या सर्व मुलामुलींचा शोध घेतला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके व शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात महिला सेलच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज व पोलीस उपनिरीक्षक प्रशाली काळे मुला-मुलींचा शोध घेत आहेत.