अवघ्या जिल्ह्याला भरलाय ‘ताप’
By Admin | Updated: July 30, 2014 23:46 IST2014-07-30T23:46:07+5:302014-07-30T23:46:07+5:30
जिल्ह्यात दूषित पाणी व डासांंच्या वाढत्या प्रादुर्भावाने विविध आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून अवघा जिल्ह्याच तापाने फणफणत असल्याचे दिसते. जुलैच्या २२ दिवसांत तापाचे ७८७ रुग्ण जिल्हा

अवघ्या जिल्ह्याला भरलाय ‘ताप’
आरोग्य यंत्रणेचे दावे फोल : जुलैच्या २२ दिवसांत ७८७ रुग्ण
अमरावती : जिल्ह्यात दूषित पाणी व डासांंच्या वाढत्या प्रादुर्भावाने विविध आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून अवघा जिल्ह्याच तापाने फणफणत असल्याचे दिसते. जुलैच्या २२ दिवसांत तापाचे ७८७ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचाराकरिता दाखल झाले आहेत. याबाबतच्या उपाययोजनांचे आरोग्य यंत्रणेचे दावे फोल ठरले आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने दूषित पाणी व डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणी तपासणी तसेच डास निर्मुलनाचे प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. मात्र, तरी सु्ध्दा जिल्ह्यात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारच्या तापांनी जिल्ह्याभरात थैमान घातले आहे. दर दिवसाला जिल्हातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णलयात दर दिवसाला नुसत्या तापाने बाधित ३५ ते ४० रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या २२ दिवसांमध्येच ७८७ तापाने ग्रासलेल्या रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. वातावरणातील बदल, दूषित पाणी पुरवठा आणि इतर अनेक कारणांमुळे आजार बळावत आहेत.