शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकवटली महिला शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

यंदा विभागात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे नुकसान अधिक आहे. येणारा रब्बी हंगाम व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती बिकट आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदतही अत्यल्प असून, शेतकरी व शेतमजुरांचे जगणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयावर धडक : राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागात परतीच्या पावसामुळे पिकांची दुरवस्था झाली. शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे अमरावतीसह पाचही जिल्ह्यांमध्ये ओला दृष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला आघाडीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली.राष्ट्रवादी काँग्रेसमहिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात महिला आंदोलनासाठी एकत्र आल्या होत्या. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदन राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे.यंदा विभागात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे नुकसान अधिक आहे. येणारा रब्बी हंगाम व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती बिकट आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदतही अत्यल्प असून, शेतकरी व शेतमजुरांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलांची सर्वाधिक ओढाताण होत आहे. ही सर्व विदारक स्थिती लक्षात घेऊन शासनाने विभागातील पाचही जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, भाजीपाला आदी पिकांना हेक्टरी २० हजार रुपये भरपाई द्यावी, संत्रा फळबागेकरिता एकरी ४० हजार रुपये मदत देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, कृषिकामांना रोहयोत प्राधान्य देऊन शेतमजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, आधारभूत किमतीनुसार शेतमालाची खरेदी त्वरित सुरू करावी, शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू करावी आदी मागण्या निवेदनात मांडल्या. आंदोलनात माजी मंत्री वसुधा देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आशा मिरगे, नागपूर जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, संगीता ठाकरे, क्रांती धोटे, शुभदा नाईक, महानगरप्रमुख सुचिता वनवे, मंदा देशमुख, स्मिता घोगरे, सरला इंगळे, मनाली बोरकर, सुषमा बर्वे, अरुणा गावंडे, संध्या वानखडे, नीलिमा शिरभाते, दुर्गा बिसने यांच्यासह विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ती सहभागी झाल्या.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिला