पवार शैक्षणिक संकुलात ऑनलाईन स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:26+5:302020-12-17T04:39:26+5:30
जणांचा सहभाग धामणगाव रेल्वे : जुना धामणगाव येथे स्व.डॉ. मुकुंदराव केशवराव पवार शैक्षणिक संकुलात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन स्नेहसंमेलन पार ...

पवार शैक्षणिक संकुलात ऑनलाईन स्नेहसंमेलन
जणांचा सहभाग धामणगाव रेल्वे : जुना धामणगाव येथे स्व.डॉ. मुकुंदराव केशवराव पवार शैक्षणिक संकुलात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन स्नेहसंमेलन पार पडले. यात एक हजार जणांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
सर्वप्रथम प्रतिष्ठानमधील "अमर जवान" येथे पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. तसेच मुकुंदराव पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. वैद्यकीय व्यवसायातून लोकसेवा व
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण हे डॉ. मुकुंदराव पवार यांचे स्वप्न साकार झाल्याचे याप्रसंगी पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रमिला पवार यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानचे सचिव शिवाजीराव पवार, समन्वयिका जया केने, प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती याप्रसंगी होती. कोरोनाकाळातही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नृत्य, गाणी यांचे विविध व्हिडीओ पाठवून या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी डॉ. मुकुंदराव पवार यांच्या जीवनावर आधारित ‘मुकुंदधून’ या चित्रफितीचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले.
फोटो - स्व. मुकुंदराव पवार यांच्या अध्याकृती पुतळ्याला हारार्पण करताना प्रमिला पवार