मेळघाटातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण अशक्यच ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:23+5:302021-06-29T04:10:23+5:30
पंकज लायदे धारणी : तालुक्यात एकूण २१३ शाळां आहेत. त्यात जिल्हा परिषद खासगी शाळा आश्रमशाळा इंग्रजी माध्यमाच्या खासगी ...

मेळघाटातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण अशक्यच ।
पंकज लायदे
धारणी : तालुक्यात एकूण २१३ शाळां आहेत. त्यात जिल्हा परिषद खासगी शाळा आश्रमशाळा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण होते. गत वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच शाळा बंद होत्या, त्या शाळा सध्या शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाइन शिक्षणाकरिता सोमवारपासून सुरू केल्या असून, येथे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे अशक्यच बाब दिसून येत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून सर्व शाळा शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीत उघडण्याचे आदेश निघाल्यानंतर धारणी तालुक्यातील २३८ शाळांची दारे उघडली आहे. तेथे शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देणे शिक्षकांना अनिवार्य केले असले तरी मेळघाटातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देणे अशक्यच असल्याचे निदर्शनात आले. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बासपाणी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा धारणी जिल्हा परिषद शाळा टिंगऱ्या येथे भेट दिली असता बासपाणी गावातील शाळेत वर्ग १ ते ५ वी पर्यंत वर्ग आहे. त्यात २०० आदिवासी विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेत होते. परंतु सध्या ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांच्याकडे व त्यांच्या पालकाकडे कोणतेही मोबाईलचे साधन नाही. त्यासोबत गावात इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे येथील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी कितीही आटापिटा केला तरी ते शक्य नसल्याची माहिती दिली त्यानंतर जिल्हा परिषद शाळा टिंगऱ्या येथे वर्ग १ ते ७ वी पर्यंत वर्ग आहे. तेथे १३५ विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेत होते. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी त्यांची पण तशीच परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे वर्ग ६ ते १२ वी पर्यंत वर्ग आहे. ही सर्वात मोठी शाळा असून येथे मराठी व उर्दू माध्यमाचे वर्ग असून ८५६ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. २३ शिक्षण विद्यादानाचे यात ग्रामीण भागातील ५० टक्के, तर शहरी भागातील ५० टक्के विद्यार्थांचा समावेश आहे. त्यासह ज्युनिअर हायस्कूल असल्याने येथे सुजाण विद्यार्थी आहे. त्यांच्याकडे किंवा त्यांच्या पालकांकडे मोबाईलची सुविधा शहरात इंटरनेट सुविधा असल्याने येथील ५०० विध्यर्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे त्याकरिता २३ कार्यरत शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुप झूम ॲपवर शिक्षण देण्यास मागील उन्हाळ्यापासून सुरुवात केली आहे. सोमवारी शाळा नव्याणे सुरू झाल्याने शिक्षकाकडे वर्ग वाटप होताच ऑनलाइन शिक्षक विद्यार्थी परिचय पार पडला. त्यासह ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवणे सुरू केले आहे.