ऑनलाईन अपॉईटमेंट, लसीकरण ‘वेटिंग’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:02+5:302021-05-08T04:13:02+5:30
शहरातील लसीकरणाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या मुद्द्यावरून आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वादावादी होत आहे. डोस नसेल ...

ऑनलाईन अपॉईटमेंट, लसीकरण ‘वेटिंग’वर
शहरातील लसीकरणाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या मुद्द्यावरून आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वादावादी होत आहे. डोस नसेल तर आम्ही काय करणार, असे कर्मचारी सांगतात. दुसरीकडे ऑनलाईन नोंदणी कशाला करायला सांगता, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. या प्रश्नाचे उत्तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडेही नसल्याने संतापात भर पडत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी भेट देऊन लसीकरणाची माहिती घेत आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडे लसीकरणाच्या गैरसोईकडे लक्ष वेधले आहे.
बॉक्स
एप्रिलचा डोस अजूनही नाही
अनेक नागरिकांना यापूर्वी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात डोस घेण्याची तारीख दिली होती. त्या दिवशी आरोग्य केंद्रावर गेल्यानंतर लस संपल्याचे सांगण्यात आले. पुन्हा गेल्यानंतर दोन दिवसांनी या, असे सांगण्यात आले. आता मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी या नागरिकांना लस मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही करायचे काय, असा सवाल आरोग्य विभागाकडे केला जात आहे.