आयटीआयची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया १० जुलैपासून
By Admin | Updated: July 5, 2014 23:21 IST2014-07-05T23:21:30+5:302014-07-05T23:21:30+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १० जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय नुकताच मुंबई येथील संचालक प्रशिक्षण कार्यालयाकडून घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता

आयटीआयची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया १० जुलैपासून
१,१२५ प्रवेश क्षमता : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे ४७ तुकड्या
अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १० जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय नुकताच मुंबई येथील संचालक प्रशिक्षण कार्यालयाकडून घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता १,१२५ विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यात आली असून ४७ तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना विविध ट्रेडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून ५ जुलैपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी शनिवारी गर्दी केली होती. मात्र मुंबईच्या संचालक प्रशिक्षण कार्यालयाकडून या तारखेत बदल करुन १० जुलैपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १ वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता १२ अभ्यासक्रम, दोन वर्षांकरिता १७ अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एकाच अर्जाव्दारे विविध आयटीआयमध्ये अर्ज करणे शक्य आहे.