कांदा आणखी वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:01 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:01:24+5:30

२८ फेब्रुवारीनंतर नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. तोपर्यंत दरवाढ कायम राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यंदा कांद्याने देशभरातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यामुळे कांदा या विषयावर तज्ज्ञांचेसुद्धा लक्ष लागले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही कांद्याचे दर कायम आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडईत ९ ते १० कांदा ठोक कांदा व्यापारी आहेत.

The onion grew even more | कांदा आणखी वधारला

कांदा आणखी वधारला

ठळक मुद्देव्यापाऱ्यांची माहिती : प्रतिकिलो शंभर रुपयांवर जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात सर्वत्र कांदा चढ्या दराने विकला जात आहे. खरीप हंगामातील कांद्याची रोपे अतिपावसामुळे जळाल्याने यंदा कांद्याचे उत्पादन घटले असून मागणी वाढली आहे. त्याकारणाने सद्यस्थितीत चांगल्या प्रतिचा कांदा ८० ते ९० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. परंतु १५ डिसेंबर पर्यंतच कांदा ठोक बाजारात १०० रुपयांच्यावर जाण्याची शक्यता आहे. खासगीत तर दर गगनाला भिडणार असल्याचे मत कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
२८ फेब्रुवारीनंतर नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. तोपर्यंत दरवाढ कायम राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यंदा कांद्याने देशभरातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यामुळे कांदा या विषयावर तज्ज्ञांचेसुद्धा लक्ष लागले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही कांद्याचे दर कायम आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडईत ९ ते १० कांदा ठोक कांदा व्यापारी आहेत. त्यांच्याकडे रोज इतर जिल्ह्यातीतून कांद्याचे ट्रक दाखल होतात. सद्यस्थितीत कांद्याला मागणी अधिक असताना रोज ५० ते ७० टन कांदा अमरावतीत दाखल होत आहे. मात्र, हा कांदा कमीत कमी २५ रुपये, तर जास्तीत जास्त चांगल्या प्रतिचा लाल व पांढºया कांद्याला ७० किलोने ठोकमध्ये शनिवारी येथील भाजीमंडईत भाव मिळाला आहे. सध्या येथील भाजी मंडईत येत असलेला कांदा कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून निर्यात होत आहे. यंदा कांदा हा विषय भाजीपाल मार्केटमध्ये सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. सामान्य नागरिकांच्या भोजनातून तर कांदा सद्यस्थितीत गायब झाल्याची परिस्थिती आहे. अनेक नागरिकांचे कांद्यामुळे महिन्याकाठीचे बजेट कोलमोडले आहे. त्यामुळे कांदा आणखी किती दिवस नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणेल, हे तर वेळच सांगू शकेल.

मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे भावात तेजी आहे. रबीचा नवीन कांदा दाखल होईस्तर १५ डिसेंबरपर्यंत ठोकमध्येच कांदा १०० किलोंवर जाण्याची शक्यता आहे. ही भाववाढ २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
- सतीश कावरे, कांदा व्यापारी

Web Title: The onion grew even more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा