एक रुपयाने शेतकऱ्यांचे वाचले ६७ कोटी पीक विमा; पहिल्यांदा राज्य शासन भरणार शेतकऱ्यांचा प्रिमियम
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 7, 2023 16:00 IST2023-08-07T16:00:25+5:302023-08-07T16:00:35+5:30
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य शासन स्व:ताचा व शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपनीकडे भरणा करणार आहे. यावर्षी ५.०९ ...

एक रुपयाने शेतकऱ्यांचे वाचले ६७ कोटी पीक विमा; पहिल्यांदा राज्य शासन भरणार शेतकऱ्यांचा प्रिमियम
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य शासन स्व:ताचा व शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपनीकडे भरणा करणार आहे. यावर्षी ५.०९ लाख शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयात सहभाग नोंदविल्याने विमा हप्त्याचे तब्बल ६७ कोटी रुपये वाचले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरी हंगामात रेकार्डब्रेक असा ५,०९,२२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. या सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा योजनेसाठी नोंदणी केल्याने दोन टक्क्यांप्रमाणे ६६ कोटी ७४ लाखांचा प्रिमियम त्यांना भरवा लागलेला नाही.
त्याऐवजी राज्य शासनाद्वारा स्व:ताचे १५७.४३ कोटी व शेतकऱ्यांचे ६६.७४ कोटी असे एकूण २२४.२२ कोटींचा प्रिमियम पीक विमा कंपनीकडे भरण्यात येणार आहे. यासोबतच केंद्र शासनदेखील स्व:ताचा १५७.४३ कोटींचा प्रिमियम भरणा करणार आहे.