उड्डाणपूलावरून पडून एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 01:32 IST2017-07-15T01:32:48+5:302017-07-15T01:32:48+5:30

स्टंटबाजी करताना उड्डाणपूलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून दोन युवक पूलाखाली कोसळले. ही घटना

One killed, one seriously injured due to flyover | उड्डाणपूलावरून पडून एक ठार, एक गंभीर

उड्डाणपूलावरून पडून एक ठार, एक गंभीर

मालवीय चौकानजीकची घटना : स्टंटबाजी करताना घडला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती
: स्टंटबाजी करताना उड्डाणपूलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून दोन युवक पूलाखाली कोसळले. ही घटना इर्विन चौक ते राजापेठकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावरील मालवीय चौकानजीक घडली. याअपघातात शुभम् महाजन (१७) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पुष्पक वसंत राठोड (१७,दोन्ही रा.दिग्रस) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
दिग्रस येथील रहिवासी शुभम् महाजन व त्याचा मित्र पुष्पक राठोड हे दोघेही शिक्षणासाठी अमरावतीत आले होते. गुरूवारी रात्री शुभम् व पुष्पक हे दोघेही दुचाकी क्रमांक एम.एच.२९-ए.झेड.-५१५६ ने भरधाव वेगात उड्डाणपूलमार्गे इर्विन चौकाकडे येत असताना मालवीय चौकानजीक उड्डाणपूलाजवळ त्यांची भरधाव दुचाकी कठड्यावर आदळली आणि दोघेही उड्डाणपूलाखाली कोसळले. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेला शुभम् हा डोक्यावर आदळल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पुष्पक हा सु्द्धा गंभीर जखमी झाला.
शुभम्, पुष्पकच्या मित्राचे पलायन
४पोलीस सूत्रानुसार शुभम् व पुष्पक हे मद्यप्राशन करून होते. त्यांच्यासोबत आणखी काही मित्र होते. सर्व मित्र पार्टी करून स्टंटबाजी करीत उड्डाणपूलावरून जात होते. मात्र, शुभम् व पुष्पक उड्डाणपूलावरून खाली कोसळताच त्यांच्या अन्य मित्रांनी तेथून पलायन केले.

Web Title: One killed, one seriously injured due to flyover