अमरावतीत गोळीबार एक ठार, चार जखमी; जुन्या वादावरून दोन गट आले समारोसमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 00:24 IST2017-12-24T00:23:38+5:302017-12-24T00:24:08+5:30
शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून आज शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोन गट समारासमोर आले. त्यांच्यात शाब्दीक वादानंतर सशस्त्र हल्ला झाला.

अमरावतीत गोळीबार एक ठार, चार जखमी; जुन्या वादावरून दोन गट आले समारोसमोर
अमरावती : शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून आज शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोन गट समारासमोर आले. त्यांच्यात शाब्दीक वादानंतर सशस्त्र हल्ला झाला. एका गटाने देशी कट्ट्यातून फायर केल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे.
अन्सार शहा जमील शहा (२८, रा. अलहीलाल कॉलनी) असे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजीक ऊर्फ राजा शहा युसूफ शहा (३५), शाकिर शहा बसीर शहा (३२) आणि नौशाद शाह मुस्ताक शाह (२८, सर्व रा. हबीबनगर) असे जखमींचे नाव आहेत. आरोपी व जखमी हे दोन्ही गट हबीबनगरातील रहीवासी आहेत. आज रात्री जुन्या वादातून दोन्ही गट आमनेसामने आले. दुचाकी वाहनाच्या हॉर्न वाजवण्यावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहीती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांच्यासह तगडा पेालिस ताफा इर्विन रुग्णालयात दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू असून आरोपीचा शोध सुरू झाला होता.