अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:32 IST2018-03-20T00:32:07+5:302018-03-20T00:32:07+5:30

शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

One day the food for food is abandoned | अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग

अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग

अमरावती : शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनांची सुकाणू समितीद्वारा एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. यामध्ये शहरात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकरी संघटना, राज्य किसान सभा, संभाजी ब्रिग्रेड, जिजाऊ ब्रिग्रेड, मराठा सेवा संघ, प्रहार शेतकरी संघटना, किसान जागृती मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जय किसान आंदोलन आदी संघटनांचा सहभाग होता.
डॉ.स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादनखर्च अधिक दीडपट उत्पन्नावर अधारित हमी भाव द्या व शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शेतकरी, मजूर, ग्रामीण कारागीरांसाठी पेन्शन कायदा लागू करा, मासिक १० हजार रूपये पेन्शन द्या, वनजमिनीचे पट्टे द्या, बोंडअळीने कपाशी पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या, शेती बियाणे, अवजारावरील जीएसटी रद्द करा, कृषिपंपाला मोफत वीजपुरवठा करा, यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी एक दिवसीय आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा चांदूर रेल्वेत निषेध
चांदूर रेल्वे : येथे अन्नत्याग आंदोलनात सचिन जाधव, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, प्रा. प्रसेनजित तेलंग, विवेक गावंडे, विलास आसोले, महेमुद हुसैन, संजय डगवार, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, सुधाकरराव थेटे, विनोद लहाने, गौतम जवंजाळ, अरूण बेलसरे, महादेवराव शेंद्रे, भीमराव खलाटे, चंदू बगाडे, अजय वाघ, बिपीन देशमुख, रामदास निस्ताने, शिवाजीराव चौधरी, सागर दुर्योधन, विजय रोडगे, कृष्णकांत पाटील, अशोक हांडे, नंदू खेरडे, सुशिल कछवे, राजू गायकवाड, संदीप ढोणे, शंकर गावंडे, प्रशांत शिरभाते, अमीत अलोने यांसह अनेक शहरवासी सहभागी झाले होते. १२ डिसेंबर १९९८ रोजी अशाच आंदोलनात शेतकरी आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात प्रकाश नानाजी काळे (राजना-नेकनानपूर), प्रमोद जवळकार (शिरपूर), गणेश शिंदे (भातकुली) मरण पावले. त्यांचे स्मरणसुद्धा यावेळी झाले. 

Web Title: One day the food for food is abandoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.