धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना मिळणार आज ई- चावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST2021-06-16T04:17:56+5:302021-06-16T04:17:56+5:30

धामणगाव रेल्वे : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तालुक्यातील दीड हजार घरकुल धारकांना घरकुल प्रवेश अंतर्गत ...

One and a half thousand households in Dhamangaon taluka will get e-keys today | धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना मिळणार आज ई- चावी

धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना मिळणार आज ई- चावी

धामणगाव रेल्वे : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तालुक्यातील दीड हजार घरकुल धारकांना घरकुल प्रवेश अंतर्गत ई चावी मिळणार आहे.

धामनगाव तालुक्यात घरकुल योजनेला पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी माया वानखडे यांच्या पुढाकाराने दीड हजार ग्रामस्थाना घरकुल मंजूर करून त्यांचे घरकुल पूर्ण करून घेण्यात आले दुसऱ्या टप्प्यात १ हजार ११६ घरकुल मंजूर करण्यात आले हे घरकुल लवकरच पूर्ण करण्यासाठी गट विकास अधिकारी वानखडे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतिना अलर्ट केले आहे

दरम्यान उद्या मंगळवारी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत मध्ये ज्या ग्रामस्थाचे घरकुल पूर्ण झाले त्यांना घरकुल प्रवेश म्हणून ई चावी देण्यात येणार आहे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सचिव यांच्या वतीने ही ई चावी देण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी माया वानखडे यांनी दिली.

Web Title: One and a half thousand households in Dhamangaon taluka will get e-keys today