शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींची पाणीपुरवठा योजना ठिकठिकाणी लिकेज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:12 IST

Amravati : जामली गावात फॉगिंग मशीनने फवारणी; परिस्थिती आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : तालुक्यातील जामली आर येथे उ‌द्भवलेली अतिसारची लागण आटोक्यात आली आहे. गावात दीड कोटी रुपयांतून झालेली पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने दूषित पाण्याने तिघांचा बळी घेणारी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. फॉगिंग मशीनने फवारणी करण्यासह टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

चिखलदरा तालुक्यातील जामली आर या गावात तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिसारची लागण झाल्याने दीडशेपेक्षा अधिक आदिवासींची तपासणी करण्यात आली. येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल २४ रुग्णांची प्रकृती आटोक्यात असून आरोग्य यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. अतिसाराची लागण झाल्याने तिघांचा मृत्यू ओढावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून त्यांच्या मृत्यूला पाणीपुरवठ्याचे निकृष्ट काम जबाबदार असल्याचे उपसरपंच विनायक येवले यांनी आरोप केला तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मेळघाटात आरोग्य यंत्रणेचा कारभार पूर्णतः ढेपाळला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ना डॉक्टर, ना परिचारिका अशी स्थिती असताना आदिवासींनी उपचार कसा व कोठे घ्यावा, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. 

गावात फॉगिंगने धूरळणी ताप व इतर आजारांची लक्षणे वाढू नये, यासाठी गावात फॉगिंग मशीनने धूरळणी करण्यात आली. टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मेळघाटात एकंदर आतापर्यंत दहा गावात अतिसाराची लागण होऊन शेकडो रुग्ण आजारी पडले. जिल्हा प्रशासनाची कागदोपत्री ढिसाळ कार्यवाही सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीपुरवठ्यात शिरले गटाराचे पाणी? जामली आर गावात दीड कोटी रुपये खर्चुन पाणीपुरवठा करणारी योजना तयार करण्यात आली परंतु, या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पाणीपुरवठा करणारे पाईप ठिकठिकाणी फुटले व त्यातूनच गटाराचे पाणी शिरल्याने नळातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे अतिसाराची लागण होऊन तिघांचा मृत्यू झाला.

जामलीत डेंग्यूचे पाच, चिकुनगुनियाचे तीन रुग्ण अतिसाची लागण असलेल्या जामली आर गावात रक्तनमुने तपासणीअंती डेंग्यूचे पाच आणि चिकनगुनियाचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळे आता नवीन संकट या गावावर ओढवले असून आरोग्य यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपायोजना करण्याची मागणी होत आहे

"जामली आर गावातील स्थिती नियंत्रणात जामलीआर गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम गावात अतिसाराची लागण होण्यास कारणीभूत ठरली आहे. ठिकठिकाणी पाईपलाईनला गळती आहे. संबंधित अधिकारी-कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी."- विनायक येवले, उपसरपंच, जामली आर

टॅग्स :Amravatiअमरावती